Ad will apear here
Next
पालघर जिल्ह्यात होणार शाळांचे समायोजन
पालघर : सहअध्ययनाने शैक्षणिक गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण मिळण्यास मदत होते. पालघर जिल्ह्यामध्ये पायाभूत पदांनुसार ६६५ पदे रिक्त असल्याने दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यास अडचणी निर्माण होत आहेत. शाळा समायोजित केल्यास त्यामधील अतिरिक्त शिक्षकांना रिक्त पदांवर सामावून घेऊन, शिक्षकांचा प्रश्न काही प्रमाणात मिटण्यास मदत होणार आहे. तसेच शासन निर्णयानुसार (वित्त विभाग ‘३० जून २०१७ अ’) अल्प उपस्थिती असलेल्या सर्व शाळांची आवश्यकता तपासून व त्यामध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलांची दुसरीकडे सोय करण्याची शक्यता तातडीने तपासून त्या शाळा बंद करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत.

पालघर जिल्हा परिषद अध्यक्षा सुरेखा थेतले, उपाध्यक्ष सचिन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. या वेळी प्राथमिक आणि माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी उपस्थित होते. पालघर जिल्ह्यामधे दोन हजार १९८ शाळा आहेत. या सर्व शाळांना दर्जेदार भौतिक सुविधा पुरविणे कठीण आहे; परंतु या शाळा समायोजित झाल्यास दर्जेदार भौतिक सुविधा पुरविणे शक्य होऊन विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर उंचावण्यास मदत होणार आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या प्रधान सचिवांनी २१ मार्च रोजीच्या बैठकीत दिलेल्या सूचना, तसेच पालकमंत्री व शिक्षणमंत्री यांच्या बैठकीतील सूचनांचे पालन करीत हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हितार्थ घेण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यामध्ये शून्य ते ३० पटाच्या ५६८ शाळा आहेत. यापैकी १२९ शाळा एक किलोमीटर अंतरातील नजीकच्या शाळांमध्ये समायोजित होणार आहेत. त्यापैकी १२ शाळा दोन शाळा मिळून एक होणार असल्याने १२३ शाळा दुसऱ्या शाळेमध्ये समायोजित झाल्याने बंद होणार आहेत.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZIMBE
Similar Posts
हत्तीरोगविरोधी एकदिवसीय औषधोपचार मोहिमेबाबत समन्वय समितीची बैठक पालघर : हत्तीरोग निर्मूलनासाठी महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांमध्ये सामुदायिक औषधोपचार मोहीम २६ जुलै ते ३० जुलै या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या संदर्भात पालघर येथे २० जुलै रोजी जिल्हा समन्वय समितीची बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांच्यामार्फत घेण्यात आली. यात या मोहिमेतील नियोजनाचा आढावा घेण्यात आला
जागतिक लोकसंख्या दिन समारंभ पालघर : जागतिक लोकसंख्या दिन म्हणून ११ जुलै हा दिवस साजरा करण्यात येतो. या निमित्ताने पालघर जिल्ह्यात ११ ते २४ जुलैदरम्यान आरोग्य संस्थांमार्फत लोकसंख्या स्थिरता पंधरवडा राबविण्यात येत आहे. ‘जोडप्यांनी जबाबदारी स्वीकारावी, कुटुंब नियोजन पद्धतीचा अवलंब करावा’ हे या वर्षासाठीचे घोषवाक्य आहे. ‘वाढती लोकसंख्या हा विकासातील मोठा अडथळा आहे
उत्कृष्ट कामगिरी केलेल्या दोन ग्रामसेवकांचा सत्कार पालघर : पालघर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा पालघरमधील संकुल सभागृहात पार पडली. पालघर जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत दोन ऑक्टोबर २०१४नंतर शौचालय बांधकाम करण्यात आलेल्या कुटुंबांचे फोटो केंद्र सरकारच्या वेबसाइटवर अपलोड करण्याला गती देण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यातील १०० टक्के शौचालयांचे
पालघर जिल्हा परिषदेत स्वातंत्र्यदिन साजरा पालघर : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून, पालघर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सुरेखा थेतले यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. सदर प्रसंगी स्वच्छता आणि संकल्पातून सिद्धीकडे नवभारत चळवळ २०१७ ते २०२२ ची प्रतिज्ञा घेण्यात आली

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language